नवी मुंबईतून आयसिसच्या संशयित दहशतवाद्याला अटक

नवी मुंबईतून आयसिसच्या संशयित दहशतवाद्याला अटक

  • Share this:

नवी मुंबई, 22 जुलै : महाराष्ट्र एटीएस आणि केरळ पोलिसांनी नवी मुंबईमधून आयसिसच्या संशयित आर्शिद कुरेशी याला अटक केलीये. केरळमधल्या तरुणांना आयसिसमध्ये भर्ती होण्यासाठी प्रेरीत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे, आणि त्याचा झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनशी संबंध असल्याचा संशय आहे. तसं स्पष्ट झालं, तर झाकिर नाईकशी संबंधित असलेली ही पहिली अटक असेल.Arshid Qureshi Photo

त्यामुळे आता झाकिर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेशी सर्व संबंधीत लोकांची आता चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. कुरेशीने केरळमधल्या 19 मुलांना आयसिसच्या मार्गावर जाण्यास प्रेरीत केलं होतं. त्यामध्ये 3 मुलींचा समावेश आहे. इतकंच नाही तर या 19 मुलांपैकी 4-5 मुलं आणि 2 ख्रिश्चन मुलींचे कुरेशीने धर्मांतर करुन त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले होते आणि त्या तीन मुलींसह एकूण 19 जणांना आर्शिद कुरेशीनं सिरीयामध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाठवले असल्याचा आरोप कुरेशीवर आहे.

नवी मुंबईमधल्या सीवूड्समधून आर्शिद कुरेशीच्या फ्लॅटवर छापा टाकून त्याला अटक केली. त्याला नवी मुंबईतील बेलापूर कोर्टात हजर करण्यात आलं, त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. आधी महाराष्ट्र एटीएस त्याची चौकशी करेल, त्यानंतर त्याला केरळ पोलिसांच्या ताब्यात दिलं जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: July 22, 2016, 2:05 PM IST

ताज्या बातम्या