डॉक्टरी पेशाला काळीमा, डॉक्टरचा रुग्ण महिलेवर बलात्कार

  • Share this:

rape dsngfsdg दिवा, 19 जुलै : दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या रुग्ण महिलेचा गैरफायदा घेऊन बलात्कार करणार्‍या डॉक्टरला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. डॉ.प्रशांत शंकरराव थोरात असं अटक डॉक्टरचं नाव असून तो डोंबिवलीतील निळजे इथं राहणारा आहे.

अत्याचारानंतर त्याने सगळं चित्रण केल्याचं सांगून ती चित्रफीत इंटरनेटवर टाकण्याची धमकी तो पीडितेला देत होता. आणि तीला वारंवार दवाखान्यात येण्यासाठी फोन करत होता. दिवा पूर्वेकडील मुंब्रादेवी कॉलनीत राहणारी 29 वर्षीय विवाहिता डॉ.थोरात याच्या दिव्यातीलच संजीवनी क्लिनिक या दवाखान्यात जानेवारी महिन्यात उपचारासाठी गेली होती. त्यावेळी या डॉक्टरने गैरफायदा घेत विवाहितेवर बलात्कार केला होता.

त्यानंतर दोन-तीन दिवसांनी फोन करून आपण याचा व्हिडिओ काढला असल्याचे सांगून, पुन्हा न आल्यास हा व्हिडिओ पतीला दाखवण्याबरोबरच इंटरनेटवर टाकण्याची धमकी दिली आणि वारंवार बलात्कार केला. यासगळ्याचा तिच्या पतीने जाब विचारल्यावर डॉक्टरनं त्याला शिवीगाळ केली. याप्रकरणी पीडित विवाहितेने मुंब्रा पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी डॉक्टरच्या मुसक्या आवळल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2016 09:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading