उद्धवने बाळासाहेबांना अंधारात ठेवून प्रॉपर्टीच्या कागदांवर सह्या घेतल्या-जयदेव ठाकरे

उद्धवने बाळासाहेबांना अंधारात ठेवून प्रॉपर्टीच्या कागदांवर सह्या घेतल्या-जयदेव ठाकरे

  • Share this:

मुंबई, 18 जुलै : उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना अंधारात ठेवून प्रॉपर्टीच्या कागदांवर त्यांची सह्या घेतल्या असा गंभीर आरोप जयदेव ठाकरे यांनी आज मुंबई हायकोर्टात केला. या आरोपामुळे उद्धव आणि जयदेव या ठाकरे बंधूंदरम्यान बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीवरुन असलेला वाद अधिकच पेटण्याची शक्यता आहे.uddhav_jaidev3

या संदर्भात हायकोर्टात जयदेव यांची उलटतपासणी सध्या सुरू आहे त्यादरम्यान जयदेव ठाकरे यांनी हा जबाब हायकोर्टात दिला आहे. ही माहिती आपल्याला खुद्द बाळासाहेबांनीच दिली होती पण यावरुन उद्धव माझ्यात वाद निर्माण होऊ नयेत म्हणून मी याबद्दल उद्धवशी कोणतीही चर्चा करु नये असंही मला बाळासाहेबांनी सांगितलं होतं असंही जयदेव यांनी सांगितलं आहे.

उद्धवने आपल्याकडून काही कागदपत्रांवर सह्या घेतल्या पण त्यात काय लिहिलं आहे ते मात्र सांगितलं नाही असं बाळासाहेबांनी आपल्याला सांगितल्याचा जबाब जयदेव यांनी दिला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून मी केलेल्या फोन कॉल्स आणि एसएमएसला उद्धवंनी कोणतंही उत्तर दिलेलं नाही असंही जयदेव यांनी कोर्टाला सांगितलंय. आपण सध्या राहत असलेला फ्लॅट हा आपण आपल्या पैशातूनच खरेदी केलाय अशी माहितीही जयदेव यांनी कोर्टाला दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: July 18, 2016, 9:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading