धनंजय मुंडेंना तात्पुरता दिलासा, 22 जुलैपर्यंत अटक न करण्याचे कोर्टाचे आदेश

धनंजय मुंडेंना तात्पुरता दिलासा, 22 जुलैपर्यंत अटक न करण्याचे कोर्टाचे आदेश

  • Share this:

18 जुलै : बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना बीडच्या अंबाजोगाई कोर्टाने दिलासा दिलाय. 22 जुलैपर्यंत धनंजय मुंडे यांना अटक न करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.dhanjay_munde3

बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी धनंजय मुं़डे फरार घोषित आहेत. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अंबाजोगाई कोर्टात अर्ज केलाय. या अर्जावर सुनावणी करताना कोर्टाने 22 जुलैपर्यंत सुनावणी पुढं ढकललीये. शिवाय धनंजय मुं़डेंना तोपर्यंत अटक करू नये असे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 147 कोटी घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी औरंगबाद हायकोर्टाकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावात धनंजय मुंडे यांना पोलिसांना फरार आरोपी म्हणून घोषित करण्याची विनंती केली होती. या प्रस्तावित फरार आरोपी यादीमध्ये धनंजय मुंडे, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील, राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह एकूण 42 जणांचा समावेश आहे. आज अंबाजोगाई कोर्टाने धनंजय मुंडेंना तात्पुरता दिलासा दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: July 18, 2016, 3:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading