गृहमंत्रिपद हे पार्ट टाइम नाही, राजीनामा द्या, तृप्ती देसाईंची मुख्यमंत्र्यांवर टीका

गृहमंत्रिपद हे पार्ट टाइम नाही, राजीनामा द्या, तृप्ती देसाईंची मुख्यमंत्र्यांवर टीका

  • Share this:

trupti_deasi317 जुलै : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी आज नगरच्या कर्जतमध्ये जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. मृत मुलीच्या आईचं त्यांनी सांत्वन केलं. नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. 2 वर्षं झाली तरी फडणवीसांनी गृहमंत्रिपद दुस-­या कुणाला दिलं नाही. हे पद पार्ट टाइम पद नाही. नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी देसाई यांनी केली.

दरम्यान, अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली मात्र त्यांना नागरिकांच्या रोषाला समोर जावं लागलं. तुमच्या घरी अशी घटना घडली असती तर तुम्ही चार दिवसांनी आला असता का, असा खडा सवाल संतप्त महिलांनी विचारला. आरोपीना संरक्षण दिल्यामुळे अजून काहीच तपास झालेला नसल्याचं सांगत त्यांनी पोलिसांना धारेवर धरले. त्याचबरोबर जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणीही केली. यावेळी राम शिंदे यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेनं त्यांना रोखले. त्यावेळी राम शिंदे यांनी पोलीस निरीक्षकांची चौकशी करुन बदली करण्याचे आश्वासन दिलं. मात्र नागरिकांनी त्यावरही आक्षेप घेतला.अखेर तुमच्या मागण्यांनुसार सर्व काही होईल, असं म्हणत शिंदे यांनी गावक­यांचा निरोप घेतला..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: July 17, 2016, 8:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading