दीड वर्षाच्या चिमुरड्याची हत्या करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2016 06:04 PM IST

दिवा, 14 जुलै : पोटच्या दोन मुलांवर वार करुन आईने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ठाण्याजवळच्या दिव्यात घडलीये. यात ईशान करमरकर या दीड वर्षांचा मुलाचा मृत्यू झालाय. तर दुसरा मुलगा गंभीर जखमी झालाय. दिव्यातल्या मुंब्रादेवी कॉलनीतल्या वैभव इमारतीत ही घटना घडलीये. संपा करमरकर असं या महिलेचं नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संपा आजारी होती. आजाराला कंटाळून तिनं मुलांवर विळीनं वार केले. तसंच स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय.

crime scene"स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी " असे आईचे वर्णन केले जाते परंतु एका आईने स्वतःच्याच तान्हुल्यांच्या गळ्यावर वार करून त्यांना मारल्याची घटना ठाण्याजवळील दिवा येथे घडली आहे. मूळ कर्नाटकातील हुबळी येथून दिव्यातील वैभव कॉलनी येथे गेली 7 ते 8 वर्षे राहणार्‍या करमरकर कुटुंबासाठी बुधवारची रात्र काळरात्र ठरली.

चिन्मय करमरकर हे आपली पत्नी संपा आणि दोन मुले, दीड वर्षाच्या ईशान आणि 10 वर्षीय चयन सोबत राहतात. संपा ही गेले अनेक महिने एका असाध्य आजाराने ग्रस्त असून त्या प्रचंड मानसिक तणावाखाली होत्या. आपल्या नंतर आपल्या मुलांचे काय होणार या भीतीने काल रात्री त्यांनी आपले पती मुंबईला कामानिमित्त गेले असता आपल्या दीड वर्षाच्या चिमुरड्याच्या गळ्यावर वार करून त्याला ठार केले. त्यानंतर तिने 10 वर्षांच्या चयनला देखील मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो बाहेर पळाल्याने त्याचा जीव वाचला.

त्याला देखील थोडी इजा झालीच. संपा हिने मग आपल्या हाताच्या नसा कापून स्वतःला देखील संपवण्याचा प्रयत्न केला. संपा आणि चयन यांना कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. चयन ला गंभीर दुखापत झाली नसल्याने त्याला प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले असून संपा हिला पुढील उपचारासाठी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. मुंब्रा पोलिस पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2016 06:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...