भाजपने सत्तेच्या हव्यासापोटी अरुणाचलमध्ये काँग्रेस सरकार बरखास्त केले -सोनिया गांधी

भाजपने सत्तेच्या हव्यासापोटी अरुणाचलमध्ये काँग्रेस सरकार बरखास्त केले -सोनिया गांधी

  • Share this:

sonia_gandhi4नांदेड, 14 जुलै : मोदी सरकारनं सत्तेच्या हव्यासापोटी अरुणाचलप्रदेश आणि उत्तराखंडमधील काँग्रेस सरकार बरखास्त करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलाय. नांदेडमध्ये शंकराराव चव्हाण यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. मोदी सरकार लोकशाहीविरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मोदींना शेतकरी आणि गोरगरिबांकडे पाहण्यासाठी वेळ नसल्याचा टोलाही सोनियांनी लगावलाय.

नांदेडमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसंच माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांच्याहस्ते काँग्रेसचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि स्मृती संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे तसंच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: July 14, 2016, 5:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading