आयसिसच्या संपर्कात असलेल्या तरुणाला परभणीतून अटक

आयसिसच्या संपर्कात असलेल्या तरुणाला परभणीतून अटक

  • Share this:

isis_pune_atsपरभणी, 14 जुलै : दहशतवादी संघटना आयसिसचा प्रचार केल्याप्रकरणी परभणीतून एका तरुणाला अटक करण्यात आलीये.

नासेर बिन याफी चाऊस असं या तरुणाचं नाव आहे. एटीएसने परभणीहून एटीएसनं या 21 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.  सीरियातल्या फारुक नावाच्या व्यक्तीशी नासेर बिन यफाई चाऊस संपर्कात असल्याची माहिती एटीएसने दिली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आलीये.

परभणीत एक तरूण सोशल मीडियाच्या माध्यमातून सीरियातील फारूक नावाच्या व्यक्तींसोबत संपर्कात असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीएसने चौकशी केली असता नासेर बिन याफी चाऊस हा देशात घातपात घडवण्याच्या तयारीत होता. एवढंच नाहीतर तो आयसिसमध्ये सामिल होण्याच्या प्रयत्नात होता. या माहितीच्या आधारे एटीएसने नासेर बिन याफी चाऊसच्या मुसक्या आवळल्या. त्याला ताब्यात घेण्यात आलं असून चौकशी सुरू आहे. याआधीही कल्याण येथील चार तरूण आयसिसमध्ये सामिल होण्यासाठी इराकला गेल्याची घटना घडली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: July 14, 2016, 4:04 PM IST

ताज्या बातम्या