ओवेसींना हादरा, एमआयएमसह 129 पक्षांची नोंदणी रद्द

ओवेसींना हादरा, एमआयएमसह 129 पक्षांची नोंदणी रद्द

  • Share this:

13 जुलै : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमला महाराष्ट्रात मोठा झटका बसलाय. निवडणूक आयोगानं एमआयएमची राज्यातली नोंदणीच रद्द केली आहे. एमआयएमसह आणखी लहान मोठ्या अशा 129 पक्षांची मान्यता रद्द केली गेली आहे. यापुढे एमआयएमला राज्यात कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही.mim_owasi

हैदराबादमधून आलेल्या असाउद्दीन ओवेसींच्या छोटेखानी एमआयएम संघटनेनं महाराष्ट्राच्या राजकारणात आपली दखल घेण्यास भाग पाडले. नांदेड,लातूर, औरंगाबाद आणि मुंबई महापालिका निवडणुकीत एमआयआयएमचे नगरसेवक निवडून आले. एवढंच नाहीतर विधानसभा निवडणुकीतही एमआयएमने धडक मारत दोन आमदार निवडून आणले. राज्याच्या राजकारणात एमआयएमची घोडदौड इतर पक्षाना धोक्याची घंटा होती. एकेकाळी 14 आमदार निवडून आणणार्‍या मनसेलाही एमआयएमने विधानसभा निवडणुकीत मागे टाकलं होतं.

पण हे सगळं होऊ शकलं ते ओवेसी बंधूंच्या वादग्रस्त भाषणांमुळे. आता या दोन्ही ओवेसी बंधुंच्या पायाखालची वाळू सरकलीये. कारण निवडणूक आयोगाने एमआयएमची राज्यातली नोंदणीच रद्द केली आहे. पक्षानं जो काही कर भरला असेल त्याची कसलीच माहिती न दिल्यामुळे एमआयएमवर ही कारवाई करण्यात आली आहे. एमआयएमसह 129 पक्षांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आगामी ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्याही ओवेसींना एमआयएमच्या नावावर लढवता येणार नाहीत. तसंच पक्षाचं निवडणूक चिन्हंही गोठवण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2016 05:34 PM IST

ताज्या बातम्या