S M L

प्रदुषित कारखान्यांना दणका, डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये 142 कारखाने 29 जुलैपर्यंत बंद

Sachin Salve | Updated On: Jul 13, 2016 01:49 PM IST

 डोंबिवली, 13 जुलै : डोंबिवली आणि अंबरनाथ येथील तब्बल 142 कारखाने बंद करण्याच्या नोटीसा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिल्या आहेत . 142 पैकी डोंबिवलीमध्ये 86 रासायनिक कारखाने आहेत . त्याच प्रमाणे रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र पण बंद करण्याचा आदेश दिला आहे. त्या प्रमाणे रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद आहे. या नोटीसला उद्योजकांच्या संघटनेने राष्ट्रीय हरित लवादाकडे अपील केले होते. त्यावर सुनावणी दरम्यान यासंदर्भात आपली बाजू मांडण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुरेसा अवधी मिळण्याची मागणी केली. ती मागणी ग्राह्य धरून लवादाने याप्रकरणाची पुढील सुनावणी 29 जुलै पर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे उद्योजक पुरते हवालदिल झाले असून पुढील सुनावणी होईपर्यंत तरी कारखाने बंद ठेवण्याची पाळी उद्योजकांवर आली आहे. 86 रासायनिक कारखान्याचे रोजचे 2 कोटी नुकसान होणार आहे तर 29 जुलैपर्यंत 40 कोटींचे नुकसान होणार आहे.

dombivali_pollustionकारखान्यातून सोडण्यात येणारे रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच नदी ,नाले आणि खाडीत सोडून देणे आता कारखानदारांना चांगलेच भोवले आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतरच ते पाणी नदी ,नाले अथवा खाडीत सोडावे ,असा नियमच आहे. मात्र या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन केले जात होते. अनेक वर्षे याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कारभारच वादाच्या भोवर्‍यात सापडला होता. राष्ट्रीय हरित लवादाने तर कोणतीही ठोस कारवाई न करणार्‍या मंडळाचे अधिकारच काढून घ्या ,अशा शब्दात ताशेरे ओढले होते. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ जागे झाले आणि ताळ्यावर आले.

डोंबिवलीत 86 तर अंबरनाथ मध्ये 142 रासायनिक कारखाने आहेत. या कारखान्यातून सोडण्यात येणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रही उभारण्यात आली आहेत .तरीही नदी ,नाले आणि खाडीत सोडण्यात येणार्‍या सांडपाण्यात प्रमाणापेक्षा अधिक सीओडी आढळून आले. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने 8 जुलै रोजी जल प्रदूषण करीत असल्याचा ठपका ठेवल्याप्रकरणी जबाबदार धरून कारखाने बंद करण्याच्या नोटीसा कारखान्यांना बजावल्या होत्या.


या नोटीसला आव्हान देत उद्योजकांच्या संघटनेने राष्ट्रीय हरित लवादाकडे अपील दाखल केले होते. त्यावर सोमवारी सुनावणी घेण्यात आली. मात्र या अपिलावर बाजू मांडण्यासाठी आपल्याला पुरेसा अवधी मिळावा,अशी मागणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने करण्यात आली. ती मागणी लवादाने मान्य करीत सुनावणी 29 जुलैपर्यंत पुढे ढकलली.

लवादाने प्रदूषण मंडळाच्या नोटीसला स्थगिती देण्यास नकार दिल्याने पुढील सुनावणी होईपर्यंत तरी हे कारखाने बंद ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे कारखानदारांसह कामगारही हवालदिल झाले आहेत. 29 जुलै पर्यंत आमचे सुमारे 40 कोटींचं नुकसान होणार आहे. रोज सुमारे 2 कोटीच होत आहे अशी माहिती कामा संघटना सद्यस आणि केमिकल कंपनी मालक नंदकुमार भागवत यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 13, 2016 01:49 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close