News18 Lokmat

जंक फूड खा, 14.5 टक्के 'फॅट टॅक्स' भरा, केरळ सरकाराचा निर्णय

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 9, 2016 03:21 PM IST

जंक फूड खा, 14.5 टक्के 'फॅट टॅक्स' भरा, केरळ सरकाराचा निर्णय

09 जुलै : जंक फूडपासून सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याला असलेला धोका लक्षात घेऊन केरळ सरकारने 'फॅट टॅक्स' लावण्याचा निर्णय घेतलाय. पीझ्झा बर्गर पास्ता यासारखं जंक फूडखाणार्‍या लोकांना ते खरेदी करताना यापुढे 14.5 टक्के अतिरिक्त कर भरावा लागेल.

आरोग्याला घातक असलेल्या गोष्टींना आळा घालून सरकारला महसूल मिळवून देण्यासाठी केरळ सरकारने हा निर्णय घेतलाय. या फॅट टॅक्सच्या माध्यमातून 10 कोटींपर्यत महसूल मिळण्याची केरळ सरकारला आशा आहे. मात्र सरकारच्या या निर्णयावर सर्वसामान्य लोकांमध्ये संमिश्र भावना आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2016 03:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...