केंद्रीय मंत्री हंसराज अहिर थोडक्यात बचावले, ताफ्यातील वाहनाला अपघात

केंद्रीय मंत्री हंसराज अहिर थोडक्यात बचावले, ताफ्यातील वाहनाला अपघात

  • Share this:

ahir_Carनागपूर - 08 जुलै : केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर अपघातातून थोडक्यात बचावले. हंसराज अहिर यांच्या ताफ्यातल्या वाहनाला भीषण अपघात झालाय. या अपघातात सुरक्षा रक्षकासह एक कार्यकर्ता जखमी झालाय.जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

चंद्रपूरचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर चंद्रपूरहून नागपूरकडे जात होते. मोरवाच्या पुढे त्यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात झाला. अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीच ज्या कारला हा अपघात झाला त्या कारमधून हंसराज अहिर खाली उतरून दुसर्‍या वाहनात बसले होते. अवघं काही किलोमिटर अंतर पार केल्यानंतर तीच कार पलटी झाली. या अपघात कारचा चक्काचूर झाला. या अपघात त्याचा सुरक्षारक्षक आणि एक कार्यकर्ता जखमी झाला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: July 8, 2016, 10:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading