राम शिंदेंना बढती, जानकरांना 'कॅबिनेट'

राम शिंदेंना बढती, जानकरांना 'कॅबिनेट'

  • Share this:

मुंबई - 08 जुलै : राज्य सरकाराचा मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा अखेर पार पडला.गृह राज्यमंत्री राम शिंदे यांना बढती मिळाली असून त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलीये. भाजपच्या एकूण 4 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली तर 2 मंत्र्याने राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महादेव जानकर यांची स्वप्नपूर्ती झाली असून त्यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलीये. भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलीये. तर शिवसेनेच्या अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.mantrimandal_vistar

युतीत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झालाय. मंत्रालयाच्या विधानभवनात सेंट्रल हॉलमध्ये नवनियुक्त मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पाडला. राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी 11

मंत्र्यांना मंत्रिपदाची आणि गोपनियतेची शपथ दिली. सर्वात प्रथम ज्येष्ठतेनुसार पांडुरंग फुंडकर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यानंतर गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

भाजपच्या पाच मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यात दिलेल्या शब्द पाळत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली. जानकर यांनी शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची व्यासपीठावर गळाभेट घेऊन आपला आनंद व्यक्त केला. लातूरला पुन्हा एकदा कॅबिनेट पदाचा बहुमान मिळालाय. लातूरचे भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलीये.

अखेरच्या टप्प्यात डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचा समावेश करून सर्वांना एकच धक्का दिला. रवींद्र चव्हाण यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतलीये. जयकुमार रावल आणि सुभाष देशमुख यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली तर सदाभाऊ खोत यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपदाला मुकावे लागले. सेनेच्या दोन्ही आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पहिल्यापासून चर्चेत असलेले अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील यांचं मंत्रिपदाचं स्वप्न मात्र यामुळे पूर्ण झालं.

यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

भाजप

पांडुरंग फुंडकर - कॅबिनेट

राम शिंदे - कॅबिनेट

जयकुमार रावल - कॅबिनेट

संभाजी पाटील निलंगेकर - कॅबिनेट

सुभाष देशमुख - कॅबिनेट

रवींद्र चव्हाण - राज्यमंत्री

मदन येरावार - राज्यमंत्री

मित्रपक्ष

महादेव जानकर - कॅबिनेट

सदाभाऊ खोत - राज्यमंत्री

शिवसेना

अर्जुन खोतकर - राज्यमंत्री

गुलाबराव पाटील - राज्यमंत्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: July 8, 2016, 1:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading