'आदर्श'तून सुटका करा, अशोक चव्हाणांच्या याचिकेवर होणार सुनावणी

  • Share this:

ashok chavan06 जुलै : कुलाब्याच्या आदर्श सोसायटी गैरव्यवहार खटल्यातून दोषमुक्त करावे अशी मागणी करणारी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची याचिका मुंबई हायकोर्टाने सुनावणीसाठी मंजूर केली आहे.

या गैरव्यवहारात राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावरही फौजदारी कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिका आरटीआय कार्यकर्ते प्रविण वाटेगावकर यांनी याचिकेद्वारे केली आहे.

त्यांच्या याचिकेवरही 3 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. या प्रकरणाताबाबत सीबीआयच्या अधिकार क्षेत्राशी संबंधित मुद्यांवर विशेष कोर्टात याचिका दाखल करण्याची सूचना अभय ओक यांच्या खंडपीठाने केली आहे. या खटल्यातील अन्य आरोपींच्या अर्जावरही 18 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: July 6, 2016, 1:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading