S M L

...त्यांनाच पत्ते पिसण्याचा अधिकार, सेनेचं 'सामना'तून स्वसांत्वन

Sachin Salve | Updated On: Jul 6, 2016 12:36 PM IST

...त्यांनाच पत्ते पिसण्याचा अधिकार, सेनेचं 'सामना'तून स्वसांत्वन

06 जुलै : केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे दुखावलेल्या शिवसेनेनं आपल्या मुखपत्र 'सामना'मधून स्वसांत्वन केलंय. भाजपकडे बहुमत असल्याने त्यांनाच पत्ते पिसण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं 'सामना'च्या संपादकीयमध्ये म्हणण्यात आलं आहे. शिवाय, मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे राज्या-राज्यातील राजकीय समीकरणं सांभाळण्यासाठी आहे, अशी टीकाही करण्यात आली आहे.

'सत्तेसाठी लाचार होणार नाही, जे हक्काचं आहे ते सन्मानाने द्या' अशी रोखठोक भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली खरी पण त्याचा काहीही भाजपवर परिणाम झाला नाही. त्यामुळे सेनेचे 'डरकाळी' आली तशी दुसर्‍याच दिवशी शांतही झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठ्या थाटात विस्तार झाला. अपेक्षेप्रमाणे सामनातून शिवसेनेनं आपली भूमिका मांडली. ऐरवी भाजप नेत्यांवर आसूड ओढणार्‍या लेखात आज सांत्वनाची भाषा होती.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार हा एनडीएचा नसून भाजपचा असल्याचं शिवसेनेनं सामनातून स्वसांत्वनच केलंय. मंत्रिमंडळ विस्तार मोदी सरकारची गती किती वाढवतोय हे येणारा काळच ठरवेल. हा विस्तार राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा म्हणजे एनडीएचा नव्हता, तर भाजपचा होता. शिवसेना, अकाली दल, तेलगु देसम या एनडीएतील घटक पक्षांना वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. भाजपकडे बहुमत आहे. त्यामुळे त्यांना पत्ते पिसण्याचा पूर्ण अधिकार आहे असं दु:खच सेनेनं व्यक्त केलं.


तसंच लोकशाहीत बहुमत हे निसरड्या लादीवरील शेवाळाप्रमाणे असते. म्हणूनच विस्तारित मंत्रिमंडळास पाय घट्ट रोवून काम करावे लागेल असा सल्लावजा टोलाही लगावलाय. तसंच रामदास आठवले यांची उत्तरप्रदेश आणि मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर गेले आणि भाजपचे मंत्री झाले. महाराष्ट्रातील रिपाइं कार्यकर्त्यांना सरकारमध्ये स्थान मिळत नाही तोपर्यंत केंद्रात मंत्रिपद स्वीकारणार नसल्याची डरकाळी रामदास आठवले यांनी फोडली होती, त्याचे काय झाले ते त्यांनाच माहीत! स्वत:चे नाव घ्यायला विसरले तसे ही डरकाळीही ते विसरले असा टोलाही सेनेनं लगावलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2016 12:36 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close