रेल्वेत लग्न केलेल्या तरुणीसोबत अबू सालेमचा फोटो व्हायरल

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 4, 2016 04:08 PM IST

रेल्वेत लग्न केलेल्या तरुणीसोबत अबू सालेमचा फोटो व्हायरल

04 जुलै : अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम जेलबाहेर सुनावणीसाठी जाताना किती ऐशोआरामी जीवन जगतो याची धक्कादायक माहिती समोर आलीये. अबू सालेमचे एका तरुणीबरोबरचे फोटो समोर आलेत. इंग्रजी वृत्तपत्र 'मीड डे'नं ही छायाचित्र प्रकाशित केली आहे. कैसर असं या तरुणीचं नाव असून ती मुंब्रा इथं राहणारी आहे. 2014च्या आसपास धावत्या ट्रेनमध्ये तीनं अबू सालेमशी लग्न केल्याची चर्चा झाली होती. याच तरुणीचे अबू सालेमबरोबरचे फोटो व्हायरल झालेत. या फोटोंपैकी एका फोटोत सालेम लखनौच्या रेल्वेच्या वेटिंग रुममध्ये फोनवर बोलत असताना दिसतोय. या फोटोंमुळे अबू किती ऐशोआरामी जीवन जगत होता हे सिद्ध झालंय.

abu_salemअंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमने चालत्या ट्रेनमध्ये लग्न केल्याचं प्रकरण पुन्हा समोर आलंय. 2014 मध्ये मुंब्रा इथल्या कैसर नावाच्या

मुलीसोबत लग्नाचे फोटो समोर आले होते. त्या फोटोंमध्ये अबू सालेम त्या मुलीसोबत दिसत होता. 2014 मध्ये जेव्हा लग्नाची बातमी समोर आलीय. तेव्हा अनेक प्रश्न समोर आले आणि आता या प्रकारचे फ़ोटो समोर आल्यानंतर जेल प्रशासन आणि स्कॉट टीमवर प्रश्न उभा होतोय.

कुणाच्या परवानगी नंतर गँगस्टरला एवढी सुविधा दिली गेली. एका फ़ोटोमधे सालेम फोनवर बोलताना ही दिसतोय. हा फोटो

लखनऊच्या रेल्वे स्थानकातील वेटींग रुम मधला असल्याचं समोर आलंय. असं बोललं जातंय की, हे फोटोज 2012 ते 15 च्या काळात काढण्यात आले आहेत. 2014 फेब्रुवारी मध्ये अबू सालेमच्या लग्नाची बातमी समोर आली होती. त्याच वर्षी जून महिन्यात कैसरने टाडा कोर्टात सालेम बरोबर लग्न करायला परवानगी मिळावी असा अर्ज केला होता.

Loading...

abu_salem2ज्यानंतर कोर्टाने सालेमचा विचार काय आहे ते विचारलं होतं. सालेम ने ही या लग्नासाठी हमी दिली होती. या मुलीने कोर्टात सांगितलं होतं की, मीडियामध्ये लग्नाची बातमी छापून येतेय म्हणून तिला खूप त्रास होतोय.आणि याच कारणाने तिला सालेम बरोबर लग्न करायचं आहे. सध्या यावर कोर्टाने काहीच निकाल दिलेला नाहीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2016 03:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...