डहाणूजवळ मालगाडी घसरली, एक्स्प्रेस सेवा अजूनही ठप्प

डहाणूजवळ मालगाडी घसरली, एक्स्प्रेस सेवा अजूनही ठप्प

  • Share this:

dhanu4304 जुलै : पश्चिम रेल्वेच्या डहाणू वाणगाव स्टेशनदरम्यान मालगाडीचे 11 डबे घसरलेत. त्यामुळे मुंबईकडे येणार्‍या लांब पल्ल्यांच्या गाड्यांची वाहतूक पूर्णपणं बंद आहे.  मात्र रूळ दुरुस्तीसाठी आणखी दहा तास लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईहून गुजरातच्या दिशेने एक ट्रॅक दुपारपर्यंत चालू होईल, असा अंदाज रेल्वे अधिकार्‍यांनी व्यक्त केलाय. अजूनही गुजरातकडून जाणारे आणि मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. उद्या सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत संपूर्ण ट्रॅक व्यवस्थित होण्याची अंदाज आहे.

मालगाडीचे डबे घसरल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेची आपत्कालिन यंत्रणा घटनास्थळी पोहचलीये. रुळांवरुन घसरलेले डबे हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान मुंबईकडे येणार्‍या सर्व लांबपल्ल्याच्या गाड्या डहाणू स्टेशनच्या आसपास थांबवण्यात आल्यात. तर मुंबईहून सुटणार्‍या फिरोजपूर जनता एक्स्प्रेस,सौराष्ट्र एक्स्प्रेस,वापी पॅसेंजर रद्द करण्यात आलीये.

या गाड्या खोळंबल्या

वडोदरा एक्सप्रेस,सौराष्ट्र जनता एक्स्प्रेस,लोकशक्ती एक्स्प्रेस,अवंतिका एक्स्प्रेस,जयपूर सुपरफास्ट

लोकलगाड्या आणि गोल्डन टेंपल, गुजरात मेल,आरवली एक्स्प्रेस, दुरांतो एक्स्प्रेस आणि इंदोर-पुणे एक्स्प्रेस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: July 4, 2016, 12:36 PM IST

ताज्या बातम्या