सैफच्या घरी लवकरच 'छोटा नवाब'चं आगमन

 सैफच्या घरी लवकरच 'छोटा नवाब'चं आगमन

  • Share this:

02 जुलै : अभिनेता सैफ अली खानच्या घरी लवकरच पाळणार हलणार आहे. करिना कपूर खान लवकरच आई होणार आहे. खुद्द सैफनेच या गोष्टीची घोषणा केलीये आणि करिनानेही या बातमीला दुजोरा दिलाय.saif_kareena

नवाब खानदानाचा हा वारस येत्या डिसेंबर महिन्यात जन्म घेईल. एका वेबसाईटला मुलाखत देताना सैफने ही गोष्ट कबुल केलीये. गेल्या काही दिवसांपासून करिना प्रेग्नंट असल्याच्या बातम्या वारंवार येत होत्या. मात्र प्रत्येक वेळी करिना वेळ येईल तेंव्हा मी स्वतः ही बातमी जाहीर करेन असं सांगत होती. अखेर या दोघांनी ही गोष्ट मान्य केलीये. नव्या बाळाच्या आगमनाची जय्यत तयारीही सुरू असल्याचं या दोघांनीही मान्य केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: July 2, 2016, 3:36 PM IST

ताज्या बातम्या