आश्रमशाळेत धान्य साठाच संपला, विद्यार्थ्यांना खिचडी खाऊन काढावे लागता दिवस !

आश्रमशाळेत धान्य साठाच संपला, विद्यार्थ्यांना खिचडी खाऊन काढावे लागता दिवस !

  • Share this:

जळगाव - 02 जुलै : जिल्ह्यातील अमळनेरच्या पिंगलवाडे येथील शासकीय आश्रम शाळेतील अन्न धान्याचा साठा संपल्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून विद्यार्थाना दाळभात,खिचडी खाऊन दिवस काढावे लागता आहेत.

jalgaon434523या आश्रम शाळेत 200 मुलं, मुली शिक्षण घेता आहेत. शाळा उघडून 15 दिवस उलटले पण या ठिकाणी या मुलांना कुठल्या ही सुविधा मिळत नाही. शाळेच्या खिडक्या तुटल्या आहेत. दरवाजे नाही मुलांच्या पेट्या भंगारमध्ये पडल्या आहेत. मुलांना बसायला पुरेसे बेंच नाहीत. आहेत त्यांच्या पाट्या तुटल्या आहेत. वर्ष उलटलं तरी मुलांना गणवेश नाही.

पुस्तक,वह्या मिळाल्या नाहीत पुरेसे वर्ग नसल्यामुळे एकाच खोलीत 9 वी 10 वीचे वर्ग भरवले जाता आहेत. त्यामुळे शिक्षक काय शिकवतात ते मुलांना समजत नाही. त्यामुळे 10 वीच्या मुलाचं नुकसान होत आहे. एवढंच नाहीतर मुलांना पाणी पिण्यासाठी ग्लास नाहीत. त्यामुळे जेवणाच्या ताटातच मुलांना पाणी प्यावं लागतं. पाईपलाईन फुटली आहे त्यामुळे तेच दूषित पाणी मुलांना प्यावं लागतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: July 2, 2016, 6:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading