S M L

मुंबईत जोरधार, लोकल 'स्लो ट्रॅक'वर

Sachin Salve | Updated On: Jul 2, 2016 06:03 PM IST

मुंबईत जोरधार, लोकल 'स्लो ट्रॅक'वर

02 जुलै : मुंबई आणि उपनगरात आज पावसाने चांगलेच धूमशान घातले. पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचल्यामुळे मुंबईकारांची कोंडी झाली. दादर, ठाणे, कुर्ला, सायन, हिंदमाता परिसरात पाणी साचल्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला. मध्य रेल्वे,पश्चिम रेल्वे आणि हार्बर लाईनवर वाहतूक स्लो ट्रॅकवर आली. तिन्ही मार्गावर धीम्यागतीने सुरू आहे. तर दुसरीकडे विकेंड आल्यामुळे मरिन ड्राईव्ह आणि गेट वे ऑफ इंडियाजवळ मुंबईकर पावसाचा आनंद लुटण्यासाठी गर्दी करत आहे.

जुलै महिना म्हणजे मुंबईसाठी पावसाचा महिना...महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार बॅटिंग करून मुंबईकरांना चिंब भिजवले.

मुंबई -दादर पूर्व येथील पूर्व दुर्तगती महामार्गावर पाणी साचले. पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. कंबर इतक पाणी साचल्यामुळे काही गाड्या पाण्यात बंद पडल्या. ठाण्याकडे जाणारी वाहतूकही धिम्यागतीनं सुरू आहे. किंग्ज सर्कल आणि परळ भागातही भरपूर पाणी साठलंय. तर खार एसव्ही रोडवरही तुफान पाणी साचलं. काही ठिकाणी अनेक घरात पाणी गेलंय. विशेष मुंबई महापालिकेनं यंदा मुंबईत पाणी साचणार नाही असा छातीठोक दावा केला होता. पण पावसाने यंदाही हा दावा फौल ठरवलाय. पुढील काही दिवस मुंबईत आणखी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 2, 2016 06:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close