नाशिकमध्ये छेडछाडीला कंटाळून शिक्षिकेची आत्महत्या

नाशिकमध्ये छेडछाडीला कंटाळून शिक्षिकेची आत्महत्या

  • Share this:

नाशिक - 01 जुलै : नाशिकमध्ये शिंदे पळसे गावातल्या एका शिक्षिकेनं तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नाशिकरोड पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.nsk32432

सामनगावच्या जिल्हा परिषद शाळेच्या या शिक्षिका वंदना जाधव..त्यांनी छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केलीये. विधवा आणि त्यात अपंग असल्याचा गैरफायदा घेत,त्यांच्याच शाळेत कराटेचं प्रशिक्षण देणारा पंकज ठाकूर त्यांना त्रास देऊ लागला. फोनवर अश्लिल बोलणे, रस्त्यात अडवणूक करणे, अंगलट येण्याचा प्रयत्न करणे याने वंदना घाबरुन गेल्या.त्यांनी पोलिसांत तक्रार केली पण पंकज त्रास देतच राहीला. अखेर वंदनाने आपलं आयुष्य संपवलं. वंदनाचा जीव गेल्यानंतर पोलिसांनी आरोपी पंकज ठाकूरला अटक केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 1, 2016 09:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading