संशोधक हरपला, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.रा.चिं. ढेरे यांचं निधन

Sachin Salve | Updated On: Jul 1, 2016 01:50 PM IST

संशोधक हरपला, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.रा.चिं. ढेरे यांचं निधन

01 जुलै : ज्येष्ठ संशोधक आणि साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांचं दिर्घ आजारानं निधन झालं. वयाच्या 87 व्या वर्षी पुण्यातल्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वैकुंठ स्मशानभूमीत विद्युतदाहिनीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामचंद्र चिंतामण ढेरे यांचा जन्म 21 जुलै 1930 सासी पुण्यातील निगडे येथे झाला. ढेर यांचा दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास या विषयांत विशेष अभ्यास होता. रा.चिं. ढेरे यांचा लोकसाहित्याचा गाढा अभ्यास होता. वयाच्या 80 व्या वर्षांपर्यंत त्यांचं संशोधन कार्य सुरू होतं. 60 पेक्षा जास्त संशोधनात्मक ग्रंथ त्यांनी लिहले. महाराष्ट्र आणि दक्षिण भारत यांच्यातले सांस्कृतिक दुवे उलगडण्याचं काम त्यांनी केलंय.

त्यांनी या विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांनी एकूण 105 पुस्तके लिहिली आहेत. रा.चिं ढेरे यांनी त्यांच्याकडील साहित्याच्या प्रेमापोटी जमा केलेला पुस्तकांचा संग्रह एखाद्या संशोधन संस्थेप्रमाणे ट्रस्टच्या माध्यमातून समाजासाठी खुला करण्याचे ठरवले होते. त्यांच्या संग्रहामध्ये इतिहास, संत साहित्य, जुने मराठी वाङ्मय, लोकसाहित्य, लोकसंस्कृती अशा वेगवेगळ्या विषयांवरील साहित्य आहे. मराठी संस्कृतीचा अभ्यास आणि संशोधन करणार्‍या तरुण संशोधकांसाठी ही पुस्तके महत्त्वाची ठरणार आहेत.

डॉ.रा.चिं. ढेरेंची साहित्यसंपदा

करवीरनिवासीनी श्री महालक्ष्मी

दत्त संप्रदायाचा इतिहास

श्री तुळजाभवानी

दक्षिणेचा लोकदेव खंडोबा

आज्ञापत्र

त्रिविधा

लज्जागौरी

श्रीनाथलीलामृत

श्रीविठ्ठल : एक महासमन्वय

स्वामी समर्थ

श्री व्यंकटेश्वर

श्री कालहस्तीश्वर

लोकसंस्कृतीचे उपासक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 1, 2016 01:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close