नात्याला काळीमा, भाचीच्या चेहर्‍याला चटके देऊन भीक मागायला लावलं !

नात्याला काळीमा, भाचीच्या चेहर्‍याला चटके देऊन भीक मागायला लावलं !

  • Share this:

लातूर - 30 जून : स्वत:च्या भाचीच्याच चेहर्‍यावर चटके देऊन तिला भिक मागायला लावल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडलीये. याप्रकरणी या मुलीची सख्खी आत्या आणि आत्याच्या प्रियकराला अटक करण्यात आलीये. लातूरच्या बुर्‍हाणनगर इथली ही घटना आहे.latur32

या लहान मुलीच्या चेहर्‍यावर चटके देऊन तिचा चेहरा विद्रुप करण्यात आला होता. स्थानिक सामाजिक महिला कार्यकर्त्याच्या दक्षतेमुळे हा प्रकार उघडकीस आलाय. या मुलीचे वडील एका घरफोडी प्रकरणात तुरुंगात आहेत. तिची आई तिचा सांभाळ करत नसल्यानं ती कविता काळे या आत्याकडे राहत होती.

कविताचा प्रियकर हक्कानी उस्मान शेख हा एका पायाने अपंग आहे. तो मशिदी समोर भीक मागायचा. काही दिवसांपासून भीक मागण्यासाठी तो मुलीला देखील घेऊन जाऊ लागला. पण चेहरा विद्रुप केला तर जास्त भीक मिळते यासाठी या दोघांनी मिळून मुलीला गरम उलथन्याने चेहर्‍यावर चटके दिले. तिच्या चेहर्‍यासह संपूर्ण शरीरावर चटके देण्यात आले आणि भीक मागण्यासाठी मशिदी बाहेर बसवलं. हा प्रकार सामाजिक कार्यकर्त्या लता गायकवाड यांना समजताच त्यांनी स्थनिक गुन्हे शाखेला कळवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: June 30, 2016, 8:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading