संजय निरुपम यांनी केली रवींद्र वायकरांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

संजय निरुपम यांनी केली रवींद्र वायकरांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

  • Share this:

मुंबई, 30 जून : शिवसेनेचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री रवींद्र वायकर यांच्यावर आरोपास्त्र उपसणारे काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रार केलीये.nirupam_meet_cm

संजय निरुपम यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या आमदार, नगरसेवक आणि नेत्यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली. गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकरांविरोधात तक्रार करण्यासाठी ही भेट होती. तसंच भाजप नेतृत्वाने शिवसेनेकडून पक्षाध्यक्ष अमित शहा यांची गब्बर सिंग म्हणून होणारी टवाळी आणि पक्षावर सातत्याने होणारी टीका गांभीर्यानं घेतली आहे. आणि आक्रमकपणे शिवसेनेला प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निरुपम यांच्या शिष्टमंडळाला दिलेली भेट ही महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

विशेष म्हणजे वायकर यांच्यावर एसआरए प्रकरणी गैरव्यवहार केल्याचा आरोप निरुपम यांनी केला असताना निरुपम वर्षा बंगल्यावर असतानाच एसआरएचे प्रमुख विश्वास पाटील हेदेखील तिथं पोहोचले. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांविरोधात मुख्यमंत्री चौकशीचे आदेश देतात का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तर निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांनी आपल्या चौकशीचे आदेश दिले आहेत असं सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: June 30, 2016, 3:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading