'फँड्री'त काम करणार्‍या कलाकाराला घरफोडी प्रकरणात अटक

'फँड्री'त काम करणार्‍या कलाकाराला घरफोडी प्रकरणात अटक

  • Share this:

yogesh_fandry28 जून : 'फँड्री' सिनेमात काम करणार्‍या एक कलाकाराला घरफोडीच्या प्रकरणात अटक करण्यात आलीये. योगेश चौधरी असं आरोपीचं नाव आहे. त्याच्यासह पाच जणांना पुणे पोलिसांनी अटक केलीये.

फँड्री सिनेमासह प्रतिज्ञा, प्रिझम या लघुपटात काम करणारा योगेश चौधरी याच्यासह पाच जणांना घरफोडीच्या गुन्ह्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीन कडून 19 लाख रुपयांचा सोन - चांदीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. योगेश बाबा चौधरी, अमोल किसन अवचरे, प्रतिक संजय वाघमारे, तसंच चोरीचा माल विकत घेणारे बिपिन बाळकृष्ण कुलकर्णी आणि सराफ व्यावसायिक सागर अशोक शहाणे अशी चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: June 28, 2016, 9:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading