युरोपियन महासंघातून ब्रिटनची एक्झिट

युरोपियन महासंघातून ब्रिटनची एक्झिट

  • Share this:

24 जून : ब्रिटीश जनतेनं युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूनं कल दिलाय. त्यामुळे युरोपियन महासंघातून ब्रिटनने एक्झिट घेतलीये. जवळपास 52 टक्के ब्रिटीश नागरिकांनी युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूनं कल दिलाय, तर 48 टक्के नागरिक युरोपियन महासंघातच राहण्याच्या बाजूचे होते.Jigsaw puzzle flag of European Union with United Kingdom flag piece, isolated on white

लंडन आणि स्कॉटलंड इथल्या नागरिकांना युरोपियन महासंघात राहण्याला पसंती होती. मात्र, उत्तर इंग्लंडचे नागरिक बाहेर पडण्यासाठी उत्सुक असल्याचं या मतमोजणीतून दिसून आलं. त्याशिवाय वेल्स आणि शायर कौंटीमधल्या नागरिकांनाही बाहेर पडायचं होतं. या निकालामुळे ब्रिटनच्या पौंड या चलनावरही परिणाम झालाय. डॉलरच्या तुलनेत पौंड घसरलाय.

दरम्यान, या घडामोडीनंतर ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी पंतप्रधानपदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले आहेत. ऑक्टोबरपर्यंत नव्या पंतप्रधानांचा शोध घेतला जाईल असं त्यांनी निकालानंतर दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलंय. डेव्हिड कॅमेरून हे ब्रिटननं युरोपियन युनियनमध्येच रहावं यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, ब्रिटीश जनतेनं त्यांचा आग्रह अव्हेरलाय. त्यामुळेच आता ब्रिटीश जनतेचा आपल्याला पाठिंबा उरलेला नाही हे त्यांनी मान्य केलंय.

ब्रिटनच्या चारही प्रांतामधल्या नागरिकांचा कल

- इंग्लंड

बाहेर पडा - 53.4%

राहा - 46.6%

- नॉर्दर्न आयर्लंड

बाहेर पडा - 44.24 %

राहा - 55.76

- स्कॉटलंड

बाहेर पडा - 38 %

राहा - 62 %

वेल्स

बाहेर पडा - 52.52 %

राहा - 47.48 %

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: June 24, 2016, 3:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading