'जम्बो' आला रे, अनिल कुंबळे टीम इंडियाचे नवे कोच

'जम्बो' आला रे, अनिल कुंबळे टीम इंडियाचे नवे कोच

  • Share this:

anil_kumble23 जून : गेल्या आठवड्याभरापासून टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कुणाची निवड होणार ? यावर सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळालाय. टीम इंडियाचा 'जॅम्बो' अर्थात अनिल कुंबळे यांनी कमबॅक करत टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारलीये.

प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री आणि अनिल कुंबळे यांच्यात जोरदार चुरस सुरू होती. अखेरीस अनिल कुंबळेने यात बाजी मारलीये. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल कुंबळेंच्या नावाची घोषणा केलीये. परंतु, एक वर्षासाठी अनिल कुंबळेंकडे प्रशिक्षकपद असणार आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षक निवडण्याची जबाबादारी ही सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्ही व्हीएस लक्ष्मण यांच्यावर सोपवण्यात आली होती.

अनिल कुंबळेंची कारकिर्द

कसोटी

मॅच 132

विकेट्स 619

सर्वोत्कृष्ट 10/74

वन-डे

मॅच - 271

विकेट्स - 337

सर्वोत्कृष्ट - 6/ 12

- इंग्लंडविरुद्ध 1990मध्ये कसोटी पदार्पण

- पाकिस्तान विरुद्ध एका डावात घेतल्या 10 विकेट्स

- कसोटीमध्ये 300 विकेट्स घेणारा पहिला भारतीय फिरकीपटू

- एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज

- कसोटीमध्ये 600 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: June 23, 2016, 6:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading