मध्य रेल्वे अखेर ट्रॅकवर,फास्ट ट्रॅकवरची वाहतूकही सुरू

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 21, 2016 09:30 PM IST

मध्य रेल्वे अखेर ट्रॅकवर,फास्ट ट्रॅकवरची वाहतूकही सुरू

मुंबई - 21 जून : आधीच कोलमडलेल्या मध्य रेल्वेवर मुंब्य्राजवळ पारसिक बोगद्याजवळ घेण्यात आलेला मेगाब्लॉक अखेर संपला आहे. तीन तासांचा घेण्यात आलेला ब्लॉक संपला असून फास्ट ट्रॅकवरची वाहतूक सुरू झाली आहे.  या ब्लॉकमुळे तब्बल 3 तासांनतर सीएसटीकडे लोकल रवाना झाली आहे. एेन संध्याकाळी मध्य रेल्वेनं वाहतूक सुरळीत करून चाकरमान्यांची वाट मोकळी करून दिलीये.  परंतू, वाहतूक अजूनही 15 ते 20 मिनिटाने उशिराने धावत आहे.

mumbai_mumbra_localआजचा दिवस मुंबईकरांसाठी अत्यंत त्रासदायक असाच आहे. सकाळपासून मुंबईकर तासंतास रेल्वे स्टेशनवर ताटकाळात उभा होता. लोकलने जरी प्रवास सुरू झाला तरी तिथेही तो लटकला. पहिल्याच पावसात कुर्ला आणि विद्याविहार स्टेशनजवळ पाणी साचल्यामुळे सकाळपासून पुन्हा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीये. प्रचंड गर्दीतून अत्यंत कमी वेगानं कसेबसे चाकरमानी आपल्या ऑफिसपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. हे कमी की काय म्हणून मुंबईतल्या टॅक्सीचालकांनीही आज अचानक संप पुकारलाय. त्यामुळे मुंबईकर पुरता हैराण झाला.

त्यातच दुपारी मुंब्रा आणि ठाणे स्थानकादरम्यान पारसिक टेकड़ीची भिंत खचल्यानं रेल्वे प्रशासनानं अलर्ट जारी केलाय. त्यामुळे तातडीने इथं तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला. तअचानक झालेल्या ब्लॉकमुळे सीएसटीकडे फास्ट मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. अखेर तीन तासांनतर ब्लाॅक संपला असून पहिली लोकल सीएसटीकडे रवाना झालीये.

पण,स्लो ट्रॅकवरून लोकल सुरू असून मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिट उशिराने धावत आहे. तर पश्चिम रेल्वेचीही वाहतूक 10 ते 15 मिनिट उशिराने सुरू आहे. ऐन संध्याकाळी चाकरमान्यांची गर्दीचा अंदाजा घेत वेळीत ब्लाॅक संपवून मध्य रेल्वेनं निदान संध्याकाळी तरी चाकरमान्यांना घरी जाण्यास मार्ग मोकळा करून दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2016 07:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...