भरात भर, मुंब्य्राजवळ पारसिक बोगद्याजवळ मेगाब्लॉक

भरात भर, मुंब्य्राजवळ पारसिक बोगद्याजवळ मेगाब्लॉक

  • Share this:

parsik_bogdaठाणे - 21 जून : पहिल्याच पावसात मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडलीये. आता भरात भर म्हणजे मुंब्य्राजवळ पारसिक बोगद्याभोवती मेगाब्लॉक सुरू झालाय. त्यामुळे दीड ते दोन तास फास्ट ट्रॅक बंद राहणार आहे. बोगद्यावरच्या संरक्षक भींतींचं काम सुरू आहे. आधीच आज गाड्या उशिरा आहेत, त्यात आता फास्ट ट्रेन बंद राहणार असल्यामुळे आणखी खोळंबा होणार आहे.

मुंब्रा आणि ठाणे स्थानकादरम्यानच्या पारसिक टेकड़ीची भिंत खचल्यानं रेल्वे प्रशासनानं अलर्ट जारी केलाय. पारसिक भोगद्यातून जाणार्‍या लोकल 30 च्या वेगाने चालवण्यात येताहेत. नेहमी पारसिक बोगद्यात लोकल 80 च्या वेगाने चालतात. 30 च्या वेगाने लोकल चालल्यामुळे 25 ते 30 मिनिटं लोकल सेवा उशिराने धावत आहे. आता दोन तासांसाठी मेगाब्लॉक जारी करण्यात आलाय. पहिल्याच पावसामुळे बोगद्यावरच्या संरक्षक भींती खचल्याची भीती आहे. त्यामुळे पुढील दुर्घटना टाळण्यासाठी वेळीच संरक्षक भींतींच्या दुरस्तीचं काम हाती घेण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2016 04:59 PM IST

ताज्या बातम्या