पहिल्याच पावसात 'मरे'चा 'फ्लॉप शो', प्रवाशांचे अतोनात हाल

पहिल्याच पावसात 'मरे'चा 'फ्लॉप शो', प्रवाशांचे अतोनात हाल

  • Share this:

mumbai_local3321 जून : आधीच रडतपडत धावणार्‍या मध्य रेल्वेची वाहतूक पहिल्याच पावसात 'फर्स्ट डे फस्ट शो फ्लॉप' ठरलाय. पहाटे झालेल्या पावसामुळे कुर्ला स्थानकाजवळ पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची सेवा कोलमडली. अजूनही अप आणि डाउन मार्गावर वेळापत्रक कोलडमडलं असून अर्ध्या तासाच्या उशिराने रेल्वे धावत आहे. त्यामुळे सर्वच स्थानकांवर प्रवाशांची तोब गर्दी झालीये. ज्या लोकल सुरू आहे त्या अगदी कासव गतीने सुरू असून प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे कधी पूर्वपदावर धावणार अशी कोणतीही सुचना केली जात नाहीये. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडालीये.

आज सकाळीही मुंबईत जोरदार पाऊस झाला आणि मुंबईची लाईफ लाईन काही तास बंद पडली कुर्ला-विद्याविहार येथे सकाळी रुळावर पाणी साचल्याने लोकल बंद पडल्या. त्यामुळे ऐन सकाळी चाकरमानी सकाळी कामासाठी बाहेर पडल्यावर त्यांना संकटाचा सामना करावा लागला. पाणी ओसरल्यावर लोकल सुरू झाल्या. लोकल 20 मिनिट ते अर्धा तास उशिराने धावत असल्याने सर्वच स्थानक प्रवाश्याच्या गर्दीने भरून गेले होते. काही लोकल रद्द करण्यात आल्या. मध्य आणि हार्बर मार्गावर तर सर्व स्टेशनवर प्रवशांची एकच गर्दी झाली होती.

मध्य रेल्वेच्या गाड्या आज जवळपास 20 ते 25 मिनिटं उशीर होत होता. त्यामुळे प्रत्येक स्थानकावर गर्दी सतत वाढत होती. ऐन गर्दीची वेळ, ऑफिस गाठण्यासाठीची घाई, गाड्यांना होणारा उशीर आणि वाढणारी गर्दी यामुळे सर्वच प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

ठाण्यातही मध्य रेल्वेचे प्रवासी त्रस्त झालेत. ठाणे ते सीएसटीच्या लोकलची संख्या कमी झाल्यामुळे आधीच कालपासून ठाण्याच्या प्रवाशांचे हाल सुरू आहेत. त्यात आज पावसाची भर पडली. पावसामुळे लोकल स्लो झाल्या. त्यामुळे ठाणे स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली. प्लॅटफॉर्म 1 वरून सीएसटीकडे गाड्या जात नसल्यामुळे या गाड्या प्लॅटफॉर्म 4 आणि 6 वर वळवण्यात आला. त्यामुळे प्रवाशांची चांगली तारांबळ उडाली.

गाड्या दुसर्‍या प्लॅटफॉर्मवर येत असल्यामुळे प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी प्रवाशांची धावपळ होत होती. त्यातच जिन्यावर असलेली गर्दी, यामुळे अनेक प्रवासी सरळ रुळांवर उतरून प्लॅटफॉर्म बदलण्याचा मार्ग स्वीकारत होते. त्याचवेळेला काही प्रवाशांनी थेट दिव्याहून ठाण्याला रेल्वे रुळावरून चालत जाणं पसंत केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: June 21, 2016, 2:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading