बॅटरी चोरीमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक तासभर ठप्प, प्रवाशांचे हाल

बॅटरी चोरीमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक तासभर ठप्प, प्रवाशांचे हाल

  • Share this:

railway problem

मुंबई - 20 जून :  माहीम रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या विद्युत उपकेंद्रातील बॅटरी बॉक्स चोरीला गेल्याचा फटका आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीला बसला. वीजपुरवठ्यातील तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक आज (सोमवारी) सकाळी सव्वा अकरापासून सुमारे तासभर ठप्प झाली होती. यामुळे गर्दीच्यावेळी प्रवाशांचे अतोनात हाल झाले. दरम्यान, दुपारी 12.23 वाजल्यापासून चारही मार्गांवरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली असली तरी गाड्या 40 ते 45 मिनिटे उशिराने धावत आहेत.

'ओएचई सर्किटमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. पुढच्या 15 मिनिटांत नेमका बिघाड शोधून युद्धपातळीवर त्याची दुरुस्ती करण्यात येईल आणि तत्काळ लोकलसेवा पूर्ववत केली जाईल', असे ट्विट पश्चिम रेल्वेने सकाळी सव्वाअकराच्या सुमारास केलं होतं. मात्र, नंतर माहीम येथील बॅटरी बॉक्स चोरीला गेल्याने हा सगळा गोंधळ उडाल्याचं पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आलं. बॅटरी चोरीमुळे वीज पुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम झाला. त्यामुळे ओव्हरहेड वायर भार घेऊ शकत नव्हती. सुमारे दीड तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर हा बिघाड दुरुस्त करण्यात आला.

दरम्यान, बॅटरी बॉक्स मोठा असतो. त्याचे वजनही प्रचंड असते. असं असताना हा बॉक्स चोरीला गेलाच कसा असा प्रश्न उपस्थित झाला असून याप्रकरणी चौकशीचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2016 03:32 PM IST

ताज्या बातम्या