शिवसेनेचा सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन, उद्धव ठाकरे आज काय बोलणार ?

शिवसेनेचा सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन, उद्धव ठाकरे आज काय बोलणार ?

  • Share this:

balasaheb and uddhavमुंबई - 19 जून : शिवसेना आज (रविवारी) सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन साजरा करत आहे. गोरेगाव येथील एक्झबिशन सेंटरमध्ये आज संध्याकाळी राज्यभरातून 25 हजार शिवसैनिक उपस्थित रहाणार आहेत. शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.

या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनी सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. पण सर्वांचं लक्ष लागलंय ते शिवसेना पक्ष प्रमुख त्यांच्या भाषणांमध्ये काय बोलणार...? येत्या सात महिन्यांनंतर राज्यातील 10 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. ज्या मीनी विधानसभा निवडणुकाच समजल्या जातात. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे विरोधकांचेही लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: June 19, 2016, 1:46 PM IST

ताज्या बातम्या