News18 Lokmat

राज्यातील धरणांमध्ये फक्त 9 टक्के पाणीसाठा शिल्लक !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2016 09:32 AM IST

राज्यातील धरणांमध्ये फक्त 9 टक्के पाणीसाठा शिल्लक !

dam_Water17 जून : एकीकडे दुष्काळ आणि मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्यामुळे हवालदिल झालेल्या राज्यातल्या धरणांमध्ये केवळ 9 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याचदरम्यानचा पाणीसाठा 16 टक्के होता. पाणी टंचाईने भेडसावणार्‍या 4 हजार 989 गावे आणि 7 हजार 939 वाड्यांना 6140 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येतोय. राज्याच्या जलाशयातील सर्व प्रकल्पांत आज केवळ 9 टक्के साठा शिल्लक आहे. त्यामुळे अजून हजारो गावं टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे.

राज्यात केवळ 9 टक्के पाणीसाठा शिल्लक, बारा हजार गावे-वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा राज्याच्या जलाशयातील एकूण उपयुक्त साठा केवळ 9 टक्के इतका शिल्लक असून पाणी टंचाईने भेडसावणार्‍या 4989 गावे आणि 7939 वाड्यांना 6140 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. धरणात 9 टक्के पाणीसाठा राज्याच्या जलाशयातील सर्व प्रकल्पांत आज केवळ 9 टक्के साठा शिल्लक असून गेल्या वर्षी याच सुमारास 16 टक्के पाणीसाठा होता.

जलाशयातील विभागनिहाय गतवर्षीचा साठा

मराठवाडा-1 टक्के (5)

कोकण-29 टक्के (30)

Loading...

नागपूर-17 टक्के (18)

अमरावती-10 टक्के (23)

नाशिक-9 टक्के (16)

पुणे-7 टक्के (18)

तेरा हजार गावे-वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा राज्यातील 4989 गावे आणि 7939 वाड्यांना 13 जूनपर्यंत 6140 टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील 2956 गावे आणि 1027 वाड्यांचा समावेश असून त्यांना 4003 टँकर्सच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. रोहयोच्या कामावर सात लाख मजूर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात 13 जून पर्यंत 40 हजार 443 कामे सुरू असून या कामांवर 6 लाख 90 हजार 925 मजुरांची उपस्थिती आहे. राज्यात 4 लाख 17 हजार 147 कामे शेल्फवर असून त्या कामांची मजूर क्षमता 1241.14 लाख एवढी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 17, 2016 09:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...