15 जून : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आता रवी शास्त्रींशिवाय माजी कर्णधार अनिल कुंबळेनेही उडी घेतलीये. यामुळे प्रशिक्षकपदाची शर्यत अजूनच रंगतदार होणार हे निश्चित आहे.
बीसीसीआयची 24 जूनला धर्मशाला इथं बैठक होणार असून, त्यात टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. रवी शास्त्री, संदीप पाटील आणि अनिल कुंबळे या दिग्गजांसह 57 जणांनी उत्सुकता दाखवली. प्रमुख नावांवर चर्चा होण्यापूर्वी इच्छुकांची यादी शॉर्टलिस्ट केली जातील.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
Follow @ibnlokmattv