आताच पेरण्या करू नका, हवामान खात्याचा सल्ला

आताच पेरण्या करू नका, हवामान खात्याचा सल्ला

  • Share this:

asdsdapy

13 जून :   मोठ्या प्रतिक्षेनंतर केरळात दाखल झालेला मान्सून आता महाराष्ट्राच्या वेशीवरच अडकून पडला आहे. त्यामुळे जोपर्यंत मान्सून पूर्णपणे सक्रीय होत नाही तोपर्यंत शेतकर्‍यांनी पेरणी करु नका असा सल्ला हवामान विभागाचे संचालक एन. चट्टोपाध्याय यांनी दिला आहे.

मान्सून राज्यात दाखल होण्यासाठी सध्या पश्चिम किनारपट्टीवर अनुकूल परिस्थिती नाही. मागच्या आठवड्यात केरळमध्ये मान्सून दाखल झाला खरा मात्र कर्नाटकच्या काही भागात पोहोचल्यानंतर मान्सून पुन्हा मंदावला. मान्सून 7 जूनला दाखल होणार असा अंदाज यापूर्वी हवामान खात्याने वर्तवला होता. पण पोषक वातावरण नसल्यानं मान्सून अजून लांबणीवर गेला आहे. त्यामुळे दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी मान्सून दाखल होईपर्यंत कोणतीही पेरणी करु नका असा सल्ला त्यांनी शेतकर्‍यांना दिला आहे.

गेल्या काही दिवसात मराठवाड्यातील अनेक भागात चांगला पाऊस झाला. मात्र, या पावसावर विश्वास ठेवून तूर्तास पेरणी करु नये. कारण मान्सूनसाठी अजूनही अनुकूल स्थिती झाली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणी करण्यासाठी थोडा वेळ वाट पाहावी, असं आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2016 11:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading