'उडता पंजाब'चा मार्ग मोकळा, फक्त 1 कटसह रिलीजला मंजूरी

'उडता पंजाब'चा मार्ग मोकळा, फक्त 1 कटसह रिलीजला मंजूरी

  • Share this:

udhta punjab in court

13 जून : 'उडता पंजाब' चित्रपटाच्या बाजूने निर्णय देत चित्रपटाला 48 तासात नवे 'ए' प्रमाणपत्र द्या, असा आदेश मुंबई हायकोर्टा सेन्सॉर बोर्डाला दिला आहे.

चित्रपटातील काही दृष्यांवर आक्षेप घेतल्याने सेन्सॉर बोर्ड आणि निर्मात्यांमध्ये चांगलाच वाद रंगला होता. बोर्डाने चित्रपटातील 89 सीन कट करण्याचा आदेश दिला होता. मात्र, यात कोणतेही आक्षेपार्ह सीन नसून, चित्रपटासाठी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर मुंबई हायकोर्टाने चित्रपटाच्या बाजूने निर्णय देत यातील 89 पैकी केवळ एकच सीन कट करण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाला दिले.

पंजाब हरितक्रांती झालेला प्रदेश आहे. इथून देशासाठी अनेक शूर सैनिक जन्माला आले आहेत. त्यामुळे एका वाक्याने प्रतिमेवर परिणाम होणार नाही, असं सेन्सॉर बोर्डाला मुंबई हायकोर्टाने सुनावले. तसंच येत्या 48 तासात नवे 'ए' प्रमाणपत्र देण्याचाही आदेश कोर्टा दिला आहे. या निर्णयामुळे सेन्सॉर बोर्डाचे पहलाज निहलानी यांना चपराक बसली आहे.

'उडता पंजाब'चा मार्ग मोकळा : कोर्टाने काय म्हटलं?

-या सिनेमात 'आमदार' किंवा 'खासदार' या शब्दांचा वापर कोणत्याही विशिष्ट पक्षाच्या संदर्भात केलेला नाही

- निवडणुकांचा विशेष अर्थाने उल्लेख झालेला नाही

-आमदार आणि खासदारांना लक्ष्य करण्यात आलेलं नाही

-विशिष्ट निवडणुका नजरेसमोर ठेवून हा सिनेमा बनवण्यात आलेला नाही.

- भारताचं सार्वभौमत्व किंवा अखंडतेला या सिनेमामुळे धक्का पोहोचत नाही

- संविधानाच्या चौकटीचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा मान राखतच सेन्सॉरशिप झाली पाहिजे

-कलात्मक स्वातंत्र्यावर कारण नसताना बंधनं आणू नयेत

- सेन्सॉर बोर्डाने समाजात होणार्‍या बदलांचं भान ठेवावं

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2016 05:45 PM IST

ताज्या बातम्या