सरकारी दवाखाण्यात डॉक्टरच नसल्याने आईच्या डोळ्यासमोर गेला चिमुकल्याचा जीव

सरकारी दवाखाण्यात डॉक्टरच नसल्याने आईच्या डोळ्यासमोर गेला चिमुकल्याचा जीव

या धक्क्याने बाळंतपण झालेल्या महिलेची प्रकृती बिघडली असून तिला शेगावच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

  • Share this:

अमोल गावंडे, बुलडाणा 29 नोव्हेंबर : बाळंतपणाची वेळ आली आणि गावरून शहरातील रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी वाहन नाही. रुग्णवाहिकेसाठी 108 वर कॉल केल्यानंतरही तासभर गाडी आली नाही. खाजगी वाहनाने खेड्यावरून येताना रस्त्यातच महिलेला प्रसुती झाली. सरकारी दवाखाण्यात गेल्यावर उपचारासाठी कुणीच नसल्याने आईच्या डोळ्यासमोर चिमुकल्याचा मृत्यू झाला. बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातली ही घटना असून आरोग्य सेवेबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. ही घटना आहे बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल भाग असलेल्या संग्रामपूर येथील. या धक्क्याने बाळंतपण झालेल्या महिलेची प्रकृती बिघडली असून तिला शेगावच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

धक्कादायक.. गरोदर मातेचा घनदाट जंगलातून अंगावर काटे आणणारा प्रवास

संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील यशोदाबाई शंकर दुगाने या महिलेला 29 नोव्हेंबर रोजी सकाळी बाळंतपणच्या प्रसूती कळा सुरू झाल्या. यावेळी पती शंकर दुगाने यांनी शासकीय रुग्णवाहिकेसाठी 108 वर संपर्क साधला. तासभर वाट पाहूनही गाडी आली नाही. म्हणून त्या महिलेला खाजगी वाहनाने संग्रामपूरला उपचारासाठी आणत असताना रस्त्यातच बाळंतपण झाले. बाळासहीत महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले गेले. मात्र, त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने तातडीने उपचार होऊ शकले नाहीत. परिणामी, जन्मलेले बाळ उपचाराअभावी दगावल्याचा आरोप शंकर दुगाने यांनी बोलताना केला आहे. या घटनेमुळे संग्रामपूर तालुक्यातील ढिसाळ आरोग्य सेवेचा प्रकार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

अजित पवारांच्या 'या' वक्तव्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार

संग्रामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरच्या बाबतीत तर कारभार रामभरोसे आहे. वकाना येथे नियुक्त असलेल्या डॉ.उजवणे यांना संग्रामपूरचाही कारभार चालवावा लागत आहे. संग्रामपूरचे डॉक्टर सुटीवर असल्याने उजवणे यांना दोन ठिकाणचा कार्यभार सांभाळताना मोठी कसरत करावी लागत असल्याचंही पुढे आलंय. या ठिकाणी दोन आरोग्य सेविकेची पदे असताना दोन्ही रिक्त आहेत. उपकेंद्रातील आरोग्य सेविकांचा कारभारही रामभरोसेच सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

Tags:
First Published: Nov 30, 2019 07:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading