13 जून : 'उडता पंजाब'या सिनेमाच्या रिलीजचा मार्ग अखेर मोकळा झालाय. या सिनेमाला 13 कट्ससहीत 'ए सर्टीफिकेट' देऊन तो रिलीज करण्याला परवानगी दिल्याचं सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पेहलाज निहलानी यांनी जाहीर केलंय. यासोबतच या सिनेमाच्या नावाला असलेला आक्षेपही सेन्सॉर बोर्डाने आता मागे घेतलाय.
उडता पंजाब सिनेमावर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता. तब्बल 89 कट्स आणि सिनेमाच्या नाव बदलण्याची सूचना सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पेहलाज निहलानी यांनी केली होती. मात्र, जर एवढे कट केले आणि सिनेमाचं नाव बदललं तर सिनेमा करण्यात अर्थ काय ? असा सवाल उपस्थिती करत निर्माते अनुराग कश्यप यांनी हायकोर्टात धाव घेतली. कश्यप यांच्या भूमिकेला अवघं बॉलिवडू समर्थनात उतरलं.
राजकीय दबावापोटीचे पेहलाज निहलानी यांनी हा निर्णय घेतल्याचा आरोपही झाला. हायकोर्टानेही सेन्सॉर बोर्डाला चांगलंच फटकारलं. जर तुम्हाला गो गोवा गॉन हे नाव चालत मग उडता पंजाब का नाही ?, तुम्ही प्रमाणपत्र देण्याचं काम करा. सिनेमा पाहणे न पाहणे हे प्रेक्षकांवर सोपवा अशा शब्दात कोर्टाने सेन्सॉर बोर्डाला फटकारून काढलं.
अखेरीस निहलानी यांनी नमत घेत उडता पंजाबला ए सर्टीफिकेट देऊन रिलीजची परवानगी दिलीये. भोपाळमध्ये बोलताना त्यांनी ही आपली भूमिका स्पष्ट केलीये. आम्ही सिनेमाला तेरा कट्स दिले असून आमचं काम आता संपलंय. जर निर्मात्याला त्यावर आक्षेप असेल तर त्याच्याकडे न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग मोकळा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबई हायकोर्ट आज यावर आपल्या निर्णय देण्याची शक्यता आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा