S M L

ओरलँडो गोळीबार : हल्लेखोराने गोळीबाराआधी स्वता:चं पोलिसांना कळवलं होतं

Sachin Salve | Updated On: Jun 13, 2016 09:02 AM IST

ओरलँडो गोळीबार : हल्लेखोराने गोळीबाराआधी स्वता:चं पोलिसांना कळवलं होतं

13 जून : अमेरिकेच्या फ्लोरिडातल्या क्लबमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी हल्लेखोराची ओळख पटली असून ओमर मतीन असं त्याचं नाव आहे. तो अफगाण वंशाचा अमेरिकन नागरिक असून तो अवघ्या 20 वर्षांचा होता. आयसीस संघटनेचा समर्थक अशीही त्याची सोशल मीडियावर ओळख आहे.

जहालमतवादी संघटनांशी त्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. हल्ला करण्यापूर्वी त्याने स्वतः 911 या क्रमांकावर फोन करून पोलिसांना घटनास्थळी बोलावल्याचंही तपासात पुढे आलंय. त्याच्या वडिलांनी या हल्ल्यामधल्या पीडितांची माफी मागितलीय.

ओरलँडो शहरात माथेफिरू ओमर मतीननं एका गे नाईटक्लबमध्ये शिरून अंधाधुंद गोळीबार केला. यात 50 जणांचा मृत्यू झाला तर 53 जण जखमी झाले. ओमर मतीनने काही वेळ 30 जणांना ओलीसही ठेवलं होतं. पोलिसांशी झालेल्या चकमकीत त्याला अखेर ठार करण्यात आलं. तीन तास हा प्रकार सुरू होता. समलिंगी आणि तृतीयपंथीयांची संख्या या क्लबमध्ये जास्त असते. हल्लेखोराला समलिंगी लोकांचा तिरस्कार असल्याचं समोर येतंय. अमेरिकेच्या इतिहासात हा सर्वात भीषण गोळीबार आहे. ओरलँडोमध्ये सध्या आणीबाणी लावण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2016 09:01 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close