S M L

फ्लोरिडा क्लबमधल्या गोळीबारात 50 जणांचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Jun 12, 2016 09:42 PM IST

फ्लोरिडा क्लबमधल्या गोळीबारात 50 जणांचा मृत्यू

pulse-nightclub-shooting

12 जून :  अमेरिकेतील फ्लोरिडा इथल्या पल्स गे नाईट क्लबमध्ये रविवारी अज्ञात हल्लेखोराने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 50 जण ठार तर 53 जण जखमी झालं असून हल्लेखोराचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

क्लबमध्ये घुसलेल्या बंदुकधारी हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी हल्लेखोराने अनेक लोकांना ओलीस धरलं होतं. हल्लेखोराच्या कमरेला बॉम्ब बांधल्याचं सांगण्यात आलं. हल्लेखोरांनी किती लोकांना ओलीस ठेवले याची माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी नाईट क्लबच्या चारही दिशांनी वेढा घातला आहे. ओलिसांना सुरक्षित सोडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू केलं परंतु यामध्ये 50 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबारात 50 जण ठार झाले असून 53 जण जखमी आहे. यामध्ये एक हल्लेखोराने आत्मघातकी बॉम्ब शरीरावर बांधून ठेवल्याचे कळतं. पोलीस-हल्लेखोराच्या धुमश्चक्रीनंतर हल्लेखोराचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आलं. जखमींवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 12, 2016 09:41 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close