राजीनामा नाट्यानंतर कामत कार्यकर्त्यांच्या भेटीला

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 11, 2016 02:43 PM IST

राजीनामा नाट्यानंतर कामत कार्यकर्त्यांच्या भेटीला

kamat34411 जून : राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केल्यानंतर आज काँग्रेसचे नेते गुरुदास कामत आपल्या अंधेरीच्या कार्यालयात पोहचले. राजीनामा नाट्यानंतर पहिल्यांदाच गुरुदास कामत कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली.

यावेळी माध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही किंवा 'ऑफ द रेकॉर्ड' पण पत्रकारांना भेटणार नाही अशी भूमिका गुरुदास कामत यांनी घेतलीये. गुरुदास कामत यांना भेटण्यासाठी राजहंस सिंग, चंद्रकांत हंडोरे, राजन सिंह, निजामुद्दीन रायन,अमरजीत सिंग मनहास, बलदेवसिंह खोसा हे नेते तसंच शीतल म्हात्रे, देवेंद्र आंबेरकर, शिवाजी सिंग चौहान हे विद्यमान नगरसेवक उपस्थित होते. विशेष म्हणजे कामत यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली होती. कामत समर्थकांनी संजय निरुपम यांच्यावरच हुकुमशहाचा आरोप केला होता. काँग्रेसच्या जेष्ठींनीही मुंबई महापालिका निवडणुका लक्षात घेता कामत यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आज कामत कार्यकर्त्यांच्या भेटीला आले. कामत आता काय निर्णय घेता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2016 02:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...