दाभोलकर हत्येप्रकरणी हिंदू जनजागरणच्या कार्यकर्त्याला अटक

दाभोलकर हत्येप्रकरणी हिंदू जनजागरणच्या कार्यकर्त्याला अटक

  • Share this:

dabholkar44410 जून : डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी पहिली अटक करण्यात आलीये. हिंदू जनजागरण समितीच्या कार्यकर्ता विरेंद्र तावडेला नवी मुंबईतून सीबीआयने अटक केली आहे. उद्या सीबीआयच्या पुण्यातील कोर्टात तावडेला हजर करणार आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने मागील आठवड्यात पुणे आणि पनवेलमध्ये छापे टाकले होते. पुण्यातील सनातन संस्थेचा साधक सारंग अकोलकर आणि डॉ. विरेंद्र सिंग तावडे यांच्या घरांवर सीबीआयने हे छापे टाकले होते. पनवेलमध्ये विरेंद्र तावडेच्या घरी धाड टाकण्यात आली होती. सीबीआयने चौकशी अंती अखेर विरेंद्र सिंग तावडेंला अटक केलीये. सुरुवातीपासूनच सनातन आणि हिंदू संघटनेवर संशय व्यक्त केला जाता होता. अखेर आज तब्बल साडेतीन वर्षांनंतर दाभोलकर हत्येप्रकरणी हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्त्याला अटक केली आहे. दाभोलकरांची हत्या का आणि कशासाठी करण्यात आली आता हे समोर आलं पाहिजे अशी प्रतिक्रिया मुक्ता दाभोलकर यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: June 10, 2016, 11:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading