काय पाहायचं ते प्रेक्षकांना ठरवू द्या,कोर्टाने 'सेन्साॅर'ला फटकारलं

काय पाहायचं ते प्रेक्षकांना ठरवू द्या,कोर्टाने 'सेन्साॅर'ला फटकारलं

  • Share this:

udhta punjab in court

मुंबई – 10 जून :  तुमचं काम प्रमाणपत्र देण्याचं आहे. टिव्ही असो किंवा सिनेमा, तो पाहायचा की नाही हे लोकांना ठरवू द्या असं सांगत मुंबई हायकोर्टाने उडता पंजाबप्रकरणी सेन्सॉर बोर्डाला चांगलेच ताशेरे ओढले आहेत. सेन्सॉरचं काम हे फक्त चित्रपटाला कात्री लावणं नाही, असंही कोर्टाने ठणकावलं आहे. त्याचबरोबर चित्रपटात वस्तुस्थिती दाखवली पाहिजे, असंही ते म्हणाले.

उडता पंजाब या सिनेमातल्या 89 सीन्सवर कात्री लावतानाच सिनेमाच्या नावातून पंजाब काढण्यासारखी सूचनाही सेन्सॉर बोर्डाने केली होती. यासंदर्भात मुंबई हायकोर्टात आज (शुक्रवारी) सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने सेन्सॉर बोर्डाच्या कामावरच प्रश्नचिन्ह उभं केले आहे. सेन्सॉरबोर्डाच्या वतीने चित्रपटातील भाषा अत्यंत शिवराळ असल्याचं सांगण्यात आलं. यावर भाषा हा चित्रपटाचा अंतर्गत विषय असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे.

तसंच पंजाब असं लिहिलेला फलक देशाच्या एकात्मतेवर घाला कसा काय असू शकतो असा सवालही कोर्टाने सेन्सॉर बोर्डाच्या वकिलांना विचारला. ही सुनावनी जवळपास 3 तास सुरू होती. पंजाबला ड्रग कॅपिटल असं दाखवण्यात आल्याचा आरोप सेन्सॉर बोर्डाच्या वकिलांनी केला. यावर, ड्रगसंदर्भात याआधी कुठल्याच सिनेमात काही दाखवण्यात आलेलं नाही का असा उलट सवालही कोर्टाने उपस्थित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: June 10, 2016, 2:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading