अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी ओबामांनी दर्शवला हिलरी क्लिंटन यांना पाठिंबा

Samruddha Bhambure | Updated On: Jun 10, 2016 02:40 PM IST

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी ओबामांनी दर्शवला हिलरी क्लिंटन यांना पाठिंबा

10 जून :अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी निश्चित झालेल्या हिलरी क्लिंटन यांचं सध्याचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अभिनंदन केलं. हिलरी क्लिंटन यांनाच आपलाही पाठिंबा असल्याचं बराक ओबामा यांनी स्पष्ट केलं. एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी हिलरी क्लिंटन यांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे.

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची उमेदवारी कोणाला मिळावी, यासाठी आतापर्यंत अमेरिकेतील लाखो लोकांनी आपले म्हणणं मांडले आहे. आता मी त्यामध्ये माझेही मत मांडू इच्छितो, असं सांगत ओबामा म्हणालं, हिलरी क्लिंटन यांनी ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी किती अवघड आहे. हे मला माहिती आहे. त्यामुळे हिलरी क्लिंटन ही जबाबदारी यशस्वी पद्धतीने पेलू शकतील, असं मला वाटतं. ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी इतका अनुभव आणि गुणवत्ता असलेली दुसरी व्यक्ती सध्यातरी मला दिसत नाही. परराष्ट्र खात्याची जबाबदारी संभाळताना त्यांची निर्णय घेण्याची अचूक क्षमता मी जवळून बघितली आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 10, 2016 12:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close