Elec-widget

नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालकांचा सावळा गोंधळ

13 सप्टेंबर, नवी मुंबई - नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांच्या निवडणुकींना सुरुवात झाली आहे. एपीएमसी मधील सर्व घटकांच्या समस्यांना न्याय मिळावा , यासाठी सर्व घटकांतून बाजार समितीवर पंचवीस संचालकांच मंडळ असतं. पण मागील सात वर्षांत या संचालक मंडळाने या घटकांकडेच पाठ फिरवली आहे.आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ म्हणून या बाजार समितीकडे पाहिलं जातं. शेत मालाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी त्रस्त आहेत, तर दुसरीकडे अनधिकृत व्यापार फोफावला आहे. दिवसाला शंभर गाड्या थेट मुंबईत जातात. यामुळे व्यापार्‍यांचा व्यापार बुडत आहे. गुंड टोळ्यांची दहशत वाढतच चालली आहे. यामुळे अधिकारी गप्प आहेत. अशा अनेक समस्यांनी सर्वच घटक त्रस्त असताना बोगस सभासद नोंदणी, बांधकामांचे टेंडर, अनधिकृत स्टॉलचे वाटप यावरच संचालक मंडळाचा भर असल्याचं बाजार समितीच्या घटकांचं म्हणणं आहे.रिलायन्स, गोदरेज या सारख्या बलाढ्य कंपन्या बाजारात उतरल्या आहेत. सरकार कडूनही त्यांना सवलती दिल्या जात आहेत. त्यामुळे व्यापार्‍यांबरोबरचं माथाडी, दलाल आणि कर्मचारी वर्ग चिंतेत आहे. एका बाजूने बाजार समित्यांचं अस्तित्व संपुष्टात येऊ लागलं आहे, पण या समस्याकडे गेल्या सात वर्षात संचालक मंडळाने ढुंकुनही पाहीलेलं नाही आचा पुन्हा नविन आश्वासन घेवून बाजारात संचालक मंडळ उतरलं आहे. संचालक मंडळाच्या कामात पारदर्शकता नसल्यामुळे यापूर्वी प्रशासक नेमण्यात आला होता. त्यावेळी बाजार समितीचा कारभार योग्य पध्दतीनं चालला. त्यामुळे आता या संचालक मंडळाचीच गरज नसल्याचं व्यापार्‍यांच म्हणणं आहे. ' शेतकरी प्रतिनीधींनी काहीच काम केल नाही. कधी बाजारात आलेच नाहीत ' , अशी प्रतिक्रिया उस्मानभाई सय्यद या व्यापार्‍याने दिली.बोगस सभासद नोंदणीमुळे काही उमेदवार पुन्हा संचालक होण्याची चिन्हं आहेत. अखेर या सावळ्या गोंधळावर कोणी अंकुश ठेवणार का, हाच खरा प्रश्न आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2008 10:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...