'नीट'च्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

'नीट'च्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

  • Share this:

raj meet cm banenr21

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंसोबत 'नीट'च्या मुद्द्यावर लढा देणारे काही पालकही उपस्थित होते.

नीटमधून राज्य सरकारांना काहीसा दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने अधिसूचनाही प्रसिद्ध केली. मात्र, त्यानंतरही राज्यातील विद्यार्थ्यांपुढील समस्या मुख्यमंत्र्यांना सांगण्यासाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली काही पालकांनी गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी पालकांनी आपले मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडले.

खाजगी महाविद्यालयं आणि डीम युनिव्हर्सिटीला नीट लागू आहे ती काढून, या महाविघालयांना सीईटीच्या धर्तीवरचं प्रवेश द्यावा. तसंच खासगी महाविद्यालयातील 85 टक्के विद्यार्थ्यांचा प्रवेश एमसीईटीच्या मार्फतचं व्हावा अशी मागणी पालकांनी आणि राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

दरम्यान, या भेटीनंतर केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्याशी बोलून तोडगा काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांना दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: June 9, 2016, 11:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading