'उडता पंजाब'चा वाद हायकोर्टात

'उडता पंजाब'चा वाद हायकोर्टात

  • Share this:

मुंबई - 08 जून : सेन्सार बोर्डाने उडता पंजाब सिनेमावर लावलेल्या कात्री विरोधात निर्माता अनुराग काश्यपने हायकोर्टात धाव घेतलीये. अनुरागच्या आगामी सिनेमा 'उडता पंजाब'मधील तब्बल 89 सीन्सवर कात्री चालवण्याचा निर्णय बोर्डाने घेतलाय. त्याविरोधात अनुरागने हायकोर्टात याचिका दाखल केली. तर दुसरीकडे आपलं म्हणणं अजूनही ठाम आहे आणि कुठल्याच राजकीय पक्षाचा आमच्या निर्णयाशी संबंध नाही असं स्पष्टीकरण सेन्सॉरचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी केलंय.

udta-punjab-posterपंजाबमधील ड्रग्स माफिया प्रकरणावर अनुराग काश्यपने 'उडता पंजाब' साकारला आहे. मात्र, त्याच्या सिनेमावर सेन्सार बोर्डाने आक्षेप घेतलाय. सिनेमाला अजून सेन्सरचं प्रशस्तीपत्र मिळालेलं नाही. बोर्डानं चित्रपट आढावा समितीकडे पाठवलाय. या समितीनं अनेक शिफारसी केल्या आहेत. अनेक संवाद आणि शॉटस् वगळणे आणि चित्रपटाचं नाव बदला, अशीही शिफारस यात आहे. चित्रपटातही पंजाबचा कोणताही उल्लेख नको, पंजाबच्या ऐवजी काल्पनिक शहर दाखवा आणि शिव्या असणारे सर्व संवाद वगळा असंही बोर्डाने सांगितलंय. पण जर एवढे सगळे सीन काढले तर सिनेमाला अर्थच उरणार नाही. बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहालानी यांनी घेतलेला हा निर्णय आम्हाला उत्तर कोरियात असल्यासारखं वाटतं अशी टीकाच काश्यपने केली होती. दुसरीकडे, या सगळ्या वादाला राजकीय पारश्वभूमीही आहे कारण पुढच्या वर्षी पंजाबमध्ये निवडणुका आहेत, आणि सध्या ड्रग्ज ही तिथे मोठी समस्या आहे.

दरम्यान, सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या कट्स आणि नावातला बदल यामुळे हे प्रकरण खूपचं चिघळलंय. या प्रकरणावर सेन्सॉर बोर्डविरुद्ध अनेक टीका आणि प्रतिक्रिया उमटताना दिसतायेत. बॉलिवूडमधून देखील काही प्रतिक्रिया यावर व्यक्त केल्या गेल्या.

'उडता पंजाब' या सिनेमाबाबत सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या सुचनांनंतर निर्माण झालेल्या वादावर एफटीआयआयचे अध्यक्ष अभिनेते गजेंद्र चौहान यांनी प्रतिक्रिया दिलीये. सेन्सॉन बोर्डानं घेतलेला निर्णय हा ठरलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसारच घेतलेल्या आहेत, असं ते म्हणाले.

अर्जुन कपूर - अभिनेता

आपल्या इंडस्ट्रीतली अनेक लोक इतर बर्‍याच विषयांवर आपली मतं मांडतात. वेळ आलीय आपल्या स्वत:साठी बोलण्याची 'उडता पंजाब'ला इतर सिनेमांसारखं रिलीज मिळणं गरजेचं आहे.

दिया मिर्झा - अभिनेत्री

ज्यांना विश्वास आहे की सिनेमे प्रेरित करतात, काही तरी शिकवतात, ते कधीच हतबल होत नाहीत.

फरहान अख्तर - अभिनेता, दिग्दर्शक

एखाद्याकडे अधिकार असण्याचं व्यसन होणं खूपच धोकादायक असतं. सीबीएफसीमध्ये कुणाला तरी लस्सी चढलीय.

गौरी शिंदे - दिग्दर्शिका

एखाद्या माणसाची जेव्हा तुम्ही जिभ हासडता, तेव्हा तुम्ही जगाला तो खोटारडा असल्याचं सिद्ध करत नसता तर तो जगाला जे सांगेल त्याची भीती तुम्हाला असते.

गोल्डी बेहल - निर्माता

एका मॅगझिनने पंजाबमधल्या ड्रग्सबद्दल लिहिलं होतं, ते चालू शकतं तर सिनेमा का नाही? कारण सिनेसृष्टी सॉफ्ट टार्गेट असते.

हंसल मेहता - दिग्दर्शक

भ्रम की संगनमत? ही संस्था जगाला आरसा दाखवणार्‍या सिनेमांना इतकी का घाबरते?

करण जोहर - दिग्दर्शक

उडता पंजाब सध्याची खरी परिस्थिती दर्शवतो, खरेपणावर सेन्सॉर करणं म्हणजे संभ्रम निर्माण करणं, या इंडस्ट्रीला खर्‍याची बाजू घेणं गरजेचंय

ऋषी कपूर - अभिनेता

विचार करा.जी नावं बदलण्याची गरज आहे त्याचा विचार करत नाही आणि कुठल्यातरी उडणार्‍या ('उडता') गोष्टी बदलायच्यात... 'पंजाब'चं सत्य उघड होईल म्हणे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: June 8, 2016, 5:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading