S M L

काँग्रेस नेते गुरूदास कामत यांचा राजकारणातून संन्यास

Samruddha Bhambure | Updated On: Jun 7, 2016 02:16 PM IST

काँग्रेस नेते गुरूदास कामत यांचा राजकारणातून संन्यास

06 जून :  मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आलेली असताना काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि गांधी घराण्याचे निष्ठावंत नेते म्हणून ओळख असलेलं गुरूदास कामत यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. याबाबतचे निवेदनच कामत यांनी प्रसिद्ध केलं आहे.

'10 दिवसांपूवच् मी सोनिया गांधींना भेटून निवृत्तीचा विचार बोलून दाखवला. त्यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाही पत्र पाठवून निवृत्तीबद्दल माहिती दिली. मात्र त्यांच्याकडून कुठलंही उत्तर आलं नाही. त्यानंतर मी काँग्रेस आणि राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, असं गुरुदास कामत यांनी दिलेल्या निवदेनात म्हटलं आहे.

गुरूदास कामत यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून, राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

गुरूदास कामत यांची राजकीय कारकीर्द

Loading...
Loading...

- 1984 - 2009 - सलग पाच वेळा लोकसभेवर

- 2009 - 2011 - केंद्रात मंत्रिपद

- 2014 - लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून पराभव

- 2014 ते 2016 - पक्षात फारसे सक्रिय दिसले नाहीत

- 2016 - राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 6, 2016 10:17 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close