दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

  • Share this:

10th_exam05 जून : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल उद्या सोमवारी म्हणजे 6 जून रोजी ऑनलाईन जाहीर होणार आहे. मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. गुणपत्रिका 15 जून रोजी शाळेत 3 वाजता मिळणार आहे.

फेब्रुवारी - मार्च महिन्यात पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागात परीक्षा घेण्यात आली होती. 12 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 10 वीचा निकाल कधी जाहीर होणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागून होती. अखेरीस आज मंडळाने तारीख जाहीर करून सर्वांना दिलासा तर दिलाच पण आता धाकधूकही वाढलीये. मागील वर्षी पेक्षा यंदा दहावीचा निकाल अगोदर लागलाय. मागील वर्षी दहावीचा निकाल 8 जूनला लागला होता यंदा तो दोन दिवस म्हणजेच 6 जूनला जाहीर होणार आहे.

या वेबसाईटवर पाहा दहावीचा निकाल

www.mahresult.nic.in

http://result.mkcl.org

mh-ssc.ac.in

http://m.rediff.com/exam_results

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: June 5, 2016, 5:31 PM IST

ताज्या बातम्या