मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मृत्यूतांडव, भीषण अपघातात 17 ठार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मृत्यूतांडव, भीषण अपघातात 17 ठार

  • Share this:

panvel_accident05 जून : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज मृत्यूचं तांडव घडलंय. पनवेलजवळ झालेल्या बस आणि कारच्या भीषण अपघातात 17 जण ठार झालेत, तर 33 जण जखमी आहेत. मृतांमध्ये एका सहा महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वर पहाटेच्या सुमारास लक्झरी बस आणि इनोव्हा आणि स्विफ्ट कारमध्ये जोरदार धडक झाली. स्विफ्ट डिझायर ही गाडी पुण्याकडून मुंबईला येणार्‍या लेनवर टायर पंक्चर झाल्या कारणाने शिवकर गावाजवळ थांबली होती आणि त्यांना मदतीसाठी इनोव्हा कार थांबली होती यादरम्यान मागून निखिल ट्रॅव्हल्स कंपनीच्या लक्झरी बसला समोरील कार दिसल्या नाहीत. त्यांना वाचविण्यासाठी लक्झरी बस चालकाने डावीकडे बस वळवली यावेळी वेगावरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली. या भीषण अपघातात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 10 महिला 6 पुरुष आणि 1 सहा महिन्यांचे बाळ आहे. इतर जखमींना कामोठेच्या एमजीएम तसंच पनवेलच्या लाइफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेय.

दरम्यान, एक्स्प्रेसवेवरचा ह्याच अपघाताचा आढावा घेण्यासाठी रामदास आठवलेही गेले होते. आढावा घेतला हे ठीक आहे. पण ते जेव्हा थांबले, तेव्हा त्यांचा ताफा पहिल्याच लेनमध्ये थांबला होता. 5 ते 6 गाड्या एक्सप्रेसवे सारख्या वाहत्या रस्त्यावर पहिल्या लेनमध्ये म्हणजेच उजव्या बाजूला उभ्या होत्या. म्हणजेच, ज्या चुकीमुळे अपघात झाला, तीच चूक ताफ्यांमधल्या चालकांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: June 5, 2016, 2:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading